कार्यालय वेळ: स. १०.०० - सायं ०५.००

ग्रामपंचायत पुनवत

तालुका : शिराळा, जिल्हा : सांगली

आमच्या गावाबद्दल

कुस्ती क्षेत्रातील हिंद केसरी पै. गणपतराव आंधळकर आबांची प्रेरणादायी गोष्ट याच गावची. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1933 रोजी एका शेतकरी कुटूंबात झाला. त्यांच्या घराला पहिल्यापासून कुस्तीची आवड होती. 

ग्रामपंचायतीची मुख्य उद्दिष्टे:

गावातील लोक मेहनती, प्रामाणिक आणि एकजुटीने राहणारे आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात विविध शासकीय योजना यशस्वीपणे राबविल्या जातात — जसे की प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी.

शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे.

घरात चुलत्यांची कुस्ती पाहून आबा लहानपणापासून कुस्ती खेळू लागले. कुस्ती क्षेत्रातील भिष्मार्चाय म्हणून ओळखले जाणारे आबा आसपासच्या गावामध्ये कुस्त्या खेळू लागले. गणपतरावांची कुस्ती पाहून त्यांच्या जवळच्या पाहुण्यांनी त्यांना कोल्हापुरच्या मोतिबाग तालमीत ठेवण्याचा त्यांच्या घरच्यांना आग्रह केला. 1950 सालापासून पै.बाबू बिरे या वस्तादाकडून आबांनी तालमीचे धडे शिकून घेतले. दिवस रात्र लाल मातीची सेवा करून आबा कुस्तीमध्ये तरबेज झाले. पुढे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात त्यांच्या कुस्त्या पाहण्यासारख्या होऊ लागल्या. 1960 साली वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हिंद केसरी किताब मिळविला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गदा देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तेव्हापासून गणपतरावांची कुस्ती आणि त्यांचे नाव अख्या देशभर घुमायं लागले. पण अजून त्यांची कुस्तीची भूक संपली न्हवती. आपली कुस्ती देशाच्या उपयोगी पडावी असे त्यांना वाटत असे. आणि लवकरच त्यांना ती ही

आमचा मार्गदर्शक दृष्टीकोन आणि प्रयत्न

दृष्टीकोन

आमचा दृष्टीकोन म्हणजे पुनवत गावाला स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर बनविणे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून सर्वांगीण प्रगती साधणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

मिशन

आमचे मिशन म्हणजे गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून गावाला स्वच्छ, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर बनविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत पुनवत ही गावातील नागरिकांसाठी विविध सुविधा आणि सेवा पुरवणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावातील प्रशासनिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्ये पार पाडण्याचे जबाबदारीपूर्ण कार्य ग्रामपंचायतीकडे आहे.

पाणीपुरवठा सेवा

गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे व देखभाल.

कचरा व्यवस्थापन व स्वच्छता

कचरा संकलन, व्यवस्थापन व स्वच्छता मोहीम राबवणे.

शिक्षणविषयक सेवा

शाळा सुधारणा, शैक्षणिक उपक्रम राबवणे.

स्मशानभूमी व्यवस्थापन

गावातील अंतिम संस्कारासाठी जागेची व्यवस्था.

अग्निशमन सेवा

आग लागल्यास त्वरित मदत व आपत्ती नियंत्रण.

वाढदिवस, विवाह, मृत्यू नोंदणी

लोकसंख्येच्या नोंदींची व्यवस्थापन.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी

श्री. नानासो बाबुराव शेळके

सरपंच

श्री. अभिजित जालिंदर शेळके

उपसरपंच

सौ. तेजश्री किरण आतकिरे

ग्रामपंचायत अधिकारी

सौ. सुनंदा बाबासो साळुंखे

सदस्या

सौ. शुभांगी आनंदा शेळके

सदस्या

श्री. पांडुरंग केशव पाटील

सदस्य

सौ. वर्षा गणेश भोळे

सदस्या

श्री. आनंदा ज्ञानू यादव

सदस्य

श्री. विशाल संपतराव जाधव

सदस्य

सौ. शोभाताई पांडुरंग सुतार

सदस्या

सौ. प्रणाली अरुण खोत

सदस्या

श्रीमती. किशोरी धनाजी जाधव

संगणक परिचालक

श्री. दिलीप काशिनाथ पाटील

शिपाई

श्री. अशोक भिमराव गुरव

पा. पुरवठा कर्मचारी

गावाची माहिती

ग्रामपंचायत

पुनवत

स्थापना

२०/०२/१९५६

क्षेत्रफळ

४०२.६२ हेक्टर

तालुका

शिराळा

जिल्हा

सांगली

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या

१८०८ (सन 2011 नुसार)

स्त्री

८३७

पुरुष

८५४

कुटुंब संख्या

४३०

अंगणवाडी

०३

जिल्हा शाळा

०२

आरोग्य केंद्र

1

पोस्ट ऑफिस

1

तलाठी ऑफिस

1